मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या ‘या’ दोन नेत्यांवर गुन्हा दाखल करा; गंभीर आरोप करत रविंद्र धंगेकर यांची मागणी
कसबा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजप आणि शिवसेनेवर आरोप केले आहेत. खास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर धंगेकर यांनी गंभीर आरोप केलेत. पाहा ते काय म्हणालेत...
पुणे : कसबा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजप आणि शिवसेनेवर आरोप केले आहेत. खास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर धंगेकर यांनी गंभीर आरोप केलेत. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात पैसे वाटले. ज्या घरात त्यांनी पैसे वाटले ते घरं माझं होतं, असं आरोप रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे नेचे प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटलांवरही निवडणूक आयोगानं गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. कसबा पोटनिवडणुकीत मी 15 ते 20 हजारांच्या मताधिक्याने निवडून येणार, असा विश्वासही रविंद्र धंगेकरांनी व्यक्त केलाय.
Published on: Feb 27, 2023 02:44 PM