भिडे यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा काँग्रेसकडून समाचार; काँग्रेस नेता म्हणाला, ‘भिडे यांना म्हातार चळ लागलीय’

| Updated on: Jun 28, 2023 | 8:51 AM

संभाजी भिडे सारख्या मनोरूग्णांना फक्त वैद्यकीय भाषेत वेढ ठरवण्याचा बाकी असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते, नेते राजू वाघमारे यांनी केली

मुंबई : संभाजी भिडे यांनी भारताच्या तिरंग्यावरुन बेताल आणि वादग्रस्त विधान केलं. त्यांनी वंदे मातरम् हे गीत राष्ट्रगीत नसल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावरून राज्यात राजकीय वातारवण चांगलचं तापलेलं आहे. यावरून आथा काँग्रेसकडून त्यांचा खरपूस समाचार घेतला जात आहे. याचमुद्द्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते, नेते राजू वाघमारे यांनी संभाजी भिडे यांच्या त्या वक्तव्याचा निषेध केला आहे. वयोमानाप्रमाणे एक तर त्यांना म्हातार चळ लागलेली असली पाहिजे किंवा त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं असलं पाहिजे अशी टीका केली आहे. तर भिडे सारख्या मनोरूग्णांना फक्त वैद्यकीय भाषेत वेढ ठरवण्याचा बाकी आहे. अशांच्या वक्तव्याकडे काँग्रेस अजिबात लक्ष देत नाही असही ते म्हणालेत.

Published on: Jun 28, 2023 08:36 AM
‘मविआचे तुकडे कधी पडले हे कळणार सुद्धा नाही; त्यामुळेच…’; भाजप नेत्याची विरोधकांवर टीका
‘नाटकात काम करतात की राजकारणात?’, सदावर्ते यांच्यावर कोणाची खरमरीत टीका?