पटोले यांच्या टीकेवर शहाजी पाटील कडाकडे; म्हणाले, त्याला वरच, खालचं कळतयं काय?

| Updated on: May 08, 2023 | 12:28 PM

सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासारखा काय झाडी काय डोंगर असा आमदार पाहीजे की आमदार रविंद्र धंगेकर यांच्या सारखा असा सवाल त्यांनी सांगोल्यातील मतदारांना केला होता.

सांगोला : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर टीका करताना शिंदे गटाच्या नेत्यावर निशाना साधला होता. सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासारखा काय झाडी काय डोंगर असा आमदार पाहीजे की आमदार रविंद्र धंगेकर यांच्या सारखा असा सवाल त्यांनी सांगोल्यातील मतदारांना केला होता. त्यावरून आता शहाजीबापू पाटील यांनी तिखट शब्दात पटोले यांचा समाचार घेतला आहे. तर माणदेशी भाषेतील म्हणी प्रमाणे पटोले यांना खालच काय आणि वरचं काय हे कळत नाही. तर सध्या काँग्रेसकडे प्रदेशाध्यक्ष पद सांभाळणारा दुसरा माणून नसल्याने यांना बसवलं आहे. तर राजकारणीत अतिशय कमी बुद्धी असणारा प्रदेशाध्यक्ष म्हणजे नाना पटोले असा टोला लगावला आहे.

Published on: May 08, 2023 12:28 PM
अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री पद सांभाळण्याची योग्यता, त्यामुळेच…; राष्ट्रवादीच्या नेत्याने व्यक्त केली इच्छा
जंतर-मंतरवर कुस्तीपटूंचं 16 व्या दिवशी आंदोलन सुरूच; काय आहे आंदोलनस्थळी परिस्थिती?