राहुल गांधी माफा मागा म्हणणाऱ्या नेत्यालाच पटोलेंच थेट उत्तर, म्हणाले…

| Updated on: Mar 25, 2023 | 1:15 PM

काँग्रेसचे नेते आशिष देशभुख यांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केल्याने काँग्रेसमधून एकच नाराजीचा सुर येत आहे.

नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची लोकसभा सदस्यता रद्द करण्यात आली. यावर विरोधकांसह सत्ताधाऱ्यांमधून विविध प्रतिक्रिया येत आहेत. तर ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागावी यासाठी भाजप आक्रमक झाला आहे. याचदरम्यान काँग्रेसचे नेते आशिष देशभुख यांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केल्याने काँग्रेसमधून एकच नाराजीचा सुर येत आहे.

यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी ते एका वाक्यात आणि एका दमात विषयच संपवून टाकला. त्यांनी आशिष देशमुख हे काँग्रेस पक्षाचे नाहीत असे म्हटलं आहे. त्यामुळे आता नवाच वाद समोर येण्याची शक्यता आहे.

आशिष देशभुख यांनी “ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. माझ्या पाठिशी मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे. मतदानाच्या रूपाने ते आपले आशिर्वाद देत असतात. राहुल गांधी यांनी मोठ्या मनाने ओबीसी समाजाची माफी मागावी”, असं म्हटलं होतं.