आमच्याकडं तोरा दाखवयाचे, आता आवाज बंद, नाना पटोले यांनी कुणाला घेरलं?

| Updated on: Oct 03, 2023 | 8:54 PM

लोकसभेच्या जागांवर ठाकरे गटाने दावा सांगितला असला तरी मेरीटप्रमाणे जागांचे वाटप केले जाईल. भाजपला सत्तेतून काढून संविधान वाचवणं ही कॉंग्रेसची भूमिका आहे असे नाना पटोले म्हणाले.

अहमदनगर : 3 ऑक्टोबर 2023 | राजस्थानच्या धर्तीवर राज्यात आरोग्य कायदा करावा. औषध आणि पैशाअभावी कुणाचा जीव जावू नये. शिक्षण आणि आरोग्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण, महाराष्ट्रातील येड्यांचे सरकार लोकांच्या जिवावर उठलेय अशी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज अनेकांचा जीव जातोय. जनतेच्या पैशाची लूट करणाऱ्या सरकारला आता माफी नाही. असे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस आम्हीच बॉस असल्याचं म्हणतात ते खरंच आहे. मंत्रीमंडळाचे सर्व निर्णय फडणवीसच घेतात. काही जण आमच्याकडे होते तेव्हा तोरा दाखवत होते. पण, आता ते उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांचा आवाजच बंद झालाय अशी टीका पटोले यांनी अजित पवार यांच्यावर केली.

Published on: Oct 03, 2023 08:54 PM
डोंबिवली येथील कोपर वेस्टमध्ये इमारत कोसळली अन्…
‘त्यांच्याकडे खूप जावई शोध धन्य आहे…’, राष्ट्रवादीचे मंत्री ‘या’ कारणावरून जितेंद्र आव्हाड यांच्यावर संतापले