पक्षाच्या ध्येयधोरणाविरोधात बोललात तर; नाना पटोलेंची तंबी

| Updated on: Mar 25, 2023 | 11:05 AM

‘छत्रपती संभाजीनगर’ नामांतराच्या वादात पक्षाच्या‎ पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या होत्या. ज्यामुळे काँग्रेसमध्येच आलबेल असल्याचे समोर येत आहे

छत्रपती संभाजीनगर‎ : काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणाविरोधात वक्तव्य करणाऱ्यांवर‎ आता कारवाई करणार अशी तंबीच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भरली आहे. यासंदर्भात शिस्तभंग समिती स्थापन‎ करण्यात आली आहे. ‘छत्रपती संभाजीनगर’ नामांतराच्या वादात पक्षाच्या‎ पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या होत्या. ज्यामुळे काँग्रेसमध्येच आलबेल असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पक्ष ध्येयधोरणाविरोधात बोलणाऱ्यांना आवर घालण्यासाठी शिस्तभंग समितीचा करण्यात आली आहे. शिस्तभंग समितीत चार जणांची आहे. या जिल्हास्तरीय समितीमध्ये अध्यक्ष शेख यांच्यासह सदस्य‎ म्हणून आमदार राजेश राठोड, सुभाष झांबड आणि भाऊसाहेब जगताप यांचा‎ समावेश आहे.

Published on: Mar 25, 2023 11:05 AM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बॅनरबाजी
‘मॅजेस्टिक आमदार निवास’ इमारतीचा कायापालट होणार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन