disqualification of MLAs : आमदार अपात्रता प्रकरणावर काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘अध्यक्षांना दिलेली मर्यादा संपतेय, त्यामुळे…’
मात्र शिवसेनेतील शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्रेसंदर्भातील निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले. तसेच याबाबत एक कालावधी देखील दिला. मात्र नार्वेकर यांनी यावर अद्यापही निर्णय घेतलेला नाही. तर आता यावर प्रक्रिया सुरू केली आहे.
नाशिक, 10 ऑगस्ट 2023 । सत्तासंघर्षाच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला दिलासा देताना हे सरकार जाणार नाही असे सांगितलं आणि ठाकरे गटाला धक्का दिला. मात्र शिवसेनेतील शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्रेसंदर्भातील निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले. तसेच याबाबत एक कालावधी देखील दिला. मात्र नार्वेकर यांनी यावर अद्यापही निर्णय घेतलेला नाही. तर आता यावर प्रक्रिया सुरू केली आहे. यावरून ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर दोन आठवड्यात उत्तर देण्यास न्यायालयाने सांगितले होते. ती मुदत आता संपत आहे. ही मुदत शुक्रवारी संपणार असून आता पुन्हा एकदा राज्यातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा तापताना दिसत आहे. यावरूनच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. त्याचबरोबर त्यांनी यावरून मोठं वक्तव्य केलं आहे. पटोले यांनी, ज्यावेळी नरहरी झिरवाळ अध्यक्ष होते, त्यांनी आपला वकील पाठवून सर्वोच्च न्यायालय जो निर्णय घेईल, तो मान्य असल्याचे सांगितलं होतं. त्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी कालावधीची मर्यादा घालून दिली होती. जी १० ऑगस्ट रोजी संपत आहे. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा पुन्हा एकदा न्यायालयात जाईल असे त्यांनी म्हटलं आहे. तर मी अध्यक्षांवर आरोप करणार नाही असे देखील पटोले यांनी म्हटलं आहे.