सामनासह अजित पवार यांना काँग्रेसच्या बड्या नेत्याचं उत्तर; म्हणाला, ”तेथे काँग्रेसच…”

| Updated on: May 29, 2023 | 3:09 PM

विरोधी पक्ष नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त असून ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळायला हवी अशी आमची इच्छा असल्याचे म्हणत दावा सांगितला आहे.

मुंबई : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवर महाविकास आघाडीत दावे प्रतिदावे पहायला मिळत आहे. विरोधी पक्ष नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त असून ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळायला हवी अशी आमची इच्छा असल्याचे म्हणत दावा सांगितला आहे. त्याला तेथील अनेक काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी विरोध करत हा पारंपारीक काँग्रेसचा मतदार संघ असल्याने तो काँग्रेसकडेच राहील अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्याचदरम्यान संजय राऊत यांनी मध्येच ट्विट करत प्रत्येकानं थोडा थोडा त्याग करा, कसेल त्याची जमीन याप्रमाणे जो जिंकेल त्याची जागा हे सूत्र ठरले तर ‘कसबा’प्रमाणे पुणे लोकसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडीला सहज जिंकता येईल असे आवाहन केलं आहे. मात्र यानंतर हा प्रश्न मिटण्या ऐवजी वाढतानाच दिसत आहे. यावरून आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा दावा केला आहे. तसेच तेथे ज्याचे मिरीट असेल त्याला ही जागा मिळेल असं म्हटलं आहे. तर येथे काँग्रेसलाच अधिक मिरीट आहे. त्यामुळे मिरीटप्रमाणे कोणाला जागा द्यायची हे बैठकीत ठरवू असे ते म्हणालेत

Published on: May 29, 2023 03:09 PM
‘नितेश राणे तुम्ही शेपूट घालून भाजपात गेलात’, कुणी केला हल्लाबोल?
नरेंद्र मोदी स्टेडिअममधील दुर्मिळ योग, शेलार-नार्वेकर-पवार यांचा एकत्र फोटो!