छ. संभाजीनगरात भाजप युवा मोर्चाकडून राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, निदर्शने; काय कारण?
काँग्रेसने शेअर केलेल्या व्हिडीओला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवरील गाणं लावण्यात आलं आहे. या व्हिडीओतून राहुल गांधींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे.
छ. संभाजीनगर : काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलरवर राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ ट्विट करत शेअर केला होता. जो नंतर हटविण्यात आला. त्यावरून आता राज्यातील भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. तसेच महाराष्ट्राची व देशाची माफी मागावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने केली आहे. काँग्रेसने शेअर केलेल्या व्हिडीओला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवरील गाणं लावण्यात आलं आहे. या व्हिडीओतून राहुल गांधींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे. त्यावरून आता राज्यातील राजकारण तापलेलं आहे. याच मुद्द्यावरून संभाजीनगरात भाजप युवा मोर्चा आक्रमक झाला आहे. क्रांती चौकात युवा मोर्चाची निदर्शने केली आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. युवा मोर्चाचे शेकडो पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
Published on: May 24, 2023 03:36 PM