नाना पटोले यांच्यासमोरच कॉंग्रेस कार्यकर्ते भिडले, कारण काय तर…

| Updated on: Oct 12, 2023 | 9:37 PM

नागपूर विभागीय बैठकीत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी राडा केला. आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. परंतु, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोरच हा राडा झाला. मात्र, यावर कॉंग्रेस नेत्याने काही वेगळंच कारण दिलंय.

नागपूर : 12 ऑक्टोबर 2023 | आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी नागपूर विभागातील काँग्रेस नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली होती. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची या बैठकीला प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत पूर्व विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला गेला. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी या बैठकीला आले होते. मात्र, या बैठकीतच कार्यकर्त्यांमध्ये हंगामा झाला. काँग्रेस शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे आणि पदाधिकारी नरेंद्र जिचकर यांच्यात यावेळी बाचाबाची झाल्याची माहिती समोर आलीय. परंतु, बैठकीत कुठलाही वाद झाला नाही. गर्दी जास्त झाली म्हणून कार्यकर्त्यांमध्ये चेंगराचेंगरी झाली. कार्यकर्त्यांमध्ये मोठा जोश होता त्यामुळे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली असे, माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी सांगितले.

Published on: Oct 12, 2023 09:36 PM
गौतमी पाटीलचा भाषणात तीन वेळा उल्लेख, ‘या’ कारणावरून शरद पवार संतापले
गोपीचंद पडळकर पुन्हा पवार कुटुंबावर बरसले, ‘रोहित पवार छोटे पिल्लू…’, माझ्यावर कधीही हल्ला…’