Special Report | शिंदे-ठाकरे सत्तासंघर्ष 5 वर्ष चालणार?

Special Report | शिंदे-ठाकरे सत्तासंघर्ष 5 वर्ष चालणार?

| Updated on: Aug 29, 2022 | 11:45 PM

कोर्टातल्या प्रकरणावरुन, जाहीरपणे वक्तव्य होताच, शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकरांनी पत्रकार परिषद घेतली. गोगावलेंची कानउघाडणी करत शिंदे गट या वक्तव्याचं समर्थन करत नसल्याचं म्हटलंय.

मुंबई : शिंदे गट आणि शिवसेनेतला कोर्टातला सत्तासंघर्ष, 5 वर्षे चालणार, असा दावाच शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंनी केला. सध्या प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या घटनापाठीसमोर गेलं. पण अजून पहिली सुनावणीही झालेली नाही. त्यातच आता कोर्टातली लढाई 4 ते 5 वर्षे चालणार, असं वक्तव्य करुन गोगावलेंनी शिवसेनेला इशारा देण्याचा प्रयत्न केला. कोर्टातल्या प्रकरणावरुन, जाहीरपणे वक्तव्य होताच, शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकरांनी पत्रकार परिषद घेतली. गोगावलेंची कानउघाडणी करत शिंदे गट या वक्तव्याचं समर्थन करत नसल्याचं म्हटलंय. तर शरद पवारांनी, गोगावलेंच्या वक्तव्यावरुन खरपूस समाचार घेतलाय. शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र करण्याची मागणी, शिंदेंचे नेतेपदी निवड आणि सरकार विरोधातच शिवसेना सुप्रीम कोर्टात गेलीय. गेल्या 2 महिन्यात तारीख पे तारीखही पाहायला मिळालीय.

Published on: Aug 29, 2022 11:45 PM
Ganesh festival 2022 : आझाद हिंद गणेश मंडळाचे यंदाचे 95वे वर्ष, गणेशोत्सवाचा उत्साह
Special Report | गुलाबराव पाटील, तुम्ही हे काय बोलले?