Stone Pelting | मोदींच्या दौऱ्याआधी कानपूरमध्ये राडा, तुफान दगडफेक
पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे. संशयाच्या आधारे काही जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे. कानपूरमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुमारे 12 पोलिस ठाण्यांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.
कानपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या कानपूर दौऱ्यावेळीच, कानपुरात हिंसाचाराची घटना घडली आहे. एका भाजपा नेत्याने मोह्हमद पैंगबर (Mohammad Paigambar) यांच्याविषयी केलेल्या या वक्तव्यानंतर शुक्रवारी मुस्लीम बहुसंख्य असलेल्या भागात बंद पुकारण्यात आला होता. पोलिसांच्या सुरक्षेतच जुम्म्याची नमाज (Prayers)अदा करण्यात आली. त्यानंतर सद्भावना चौकीजवळ दोन्ही पक्ष आमनेसामने आले. गर्दीला अटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. सध्या कानपुरात तणाववूर्ण शांतता आहे. ही घटना कानपूरच्या बेकगंज भागात शुक्रवारच्या नमाजानंतर घडली.
Published on: Jun 03, 2022 08:01 PM