Special Report : औवेसी यांच्या सभेत औरंगजेबाचा नारा? दावा खरा की खोटा?

| Updated on: Jun 26, 2023 | 7:56 AM

याचदरम्यान आता बुलढाणा येथे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेवरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे. ओवैसी यांच्या सभेत कार्यकर्त्यांनी औरंगजेबच्या घोषणा दिल्याचा आरोप आता होत आहे.

मुंबई : औरंगजेबाच्या स्टेटस आणि फोटोवरून राज्यातील अनेक जिल्ह्यात चांगलाच गदारेळ झाला आहे. तो शांत करण्याचा प्रयत्न शासनासह जिल्हास्तरावर शांतता कमिटी करत आहेत. याचदरम्यान आता बुलढाणा येथे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेवरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे. ओवैसी यांच्या सभेत कार्यकर्त्यांनी औरंगजेबच्या घोषणा दिल्याचा आरोप आता होत आहे. तर यावरून हिंदु संघटना आक्रमक झाल्या असून राजकीय नेत्यांनी याचा निषेध करत टीका केली आहे. त्याचदरम्यान बुलढाणा पोलीसांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. आता याप्रकरणी पोलीसांकडून व्हिडिओची तपास सुरू आहे. मात्र ओवैसी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, सभेत घोषणाबाजी करण्यात आलेली नाही. तर माध्यमांध्ये चुकीच्या बातम्या दाखवल्या जात असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे त्या सभेत नेमकं काय झालं? नारे दिले गेले काय? त्यावर प्रतिक्रिया काय यावर हा स्पेशल रिपोर्ट

Published on: Jun 26, 2023 07:56 AM
मुख्यमंत्री शिंदे यांचा पंढरपुरात पाहाणी दौरा; रस्ते खड्डेमुक्त करण्याचे दिले आदेश
पंढरपुरातील बॅनरवरून नवा वाद; पांडरंगाचा अपमान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, तर भाजप नेता म्हणतो…