Vidhanbhavan परिसरात विरोधकांची भन्नाट घोषणाबाजी, स्थगिती सरकारच्या नावाने घोषणा – tv9
सत्ताधारी सरकारला घेरण्यासाठी आज अधिवेशनाच्या दिवशी विरोधकांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी ईडी सरकार, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या अशा अनेक मुद्यांवरून विरोधी बाकावर बसलेल्या नेतेमंडळींनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
सत्ताधारी सरकारला घेरण्यासाठी आज अधिवेशनाच्या दिवशी विरोधकांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी ईडी सरकार, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या अशा अनेक मुद्यांवरून विरोधी बाकावर बसलेल्या नेतेमंडळींनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर विरोधकांनी आज 50-50 बिक्सिटचे पॅकेट दाखवत ’50 – 50 चलो गुवाहाटी’ अशा अनोख्या पद्धतीने नारेबाजी केली. यावेळी ओला दुष्काळ जाहीर करा, अशी आग्रहाची मागणी विरोधकांनी केली. याशिवाय ‘आले रे आले गद्दार आले’, ‘विकास कामांना स्थगिती देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ’50 खोके 50 खोके, खाऊन खाऊन माजलेत बोके’, ‘ईडी सरकार हाय, हाय, सीबीआय सरकार हाय, हाय’ अशा घोषणा विरोधकांनी दिल्या आहे.