Yogesh Sagar यांचं मुंबईबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य-tv9
आमदार योगेश सागर यांनी मुंबईतील रस्त्यांच्या समस्येबाबत बोलताना, मुंबईतील रस्त्यांची अवस्था ही गरीब की जोरु आणि सबकी भाभी... असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
राज्याचे अधिवेशन सध्या सुरू असून पायऱ्यांवरील अनेक घोषणांनी ते गाजत आहे. यादरम्यान सभागृहातील काही वक्तव्यांमुळे देखील आता हे अधिवेशन गाजणार आहे. तर या वक्तव्यांमुळे टीका ही होताना पहायला मिळत आहे. राज्यातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून अनेकांना त्याचा फटका बसत आहे. असाच फटका मुंबईला देखिल बसत आहे. मुंबईतील रस्त्यांच्या समस्येबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिल्यानंतर, योगेश सागर हे बोलायला उभे राहिले आणि त्यांची जीभ घसरली. आमदार योगेश सागर यांनी मुंबईतील रस्त्यांच्या समस्येबाबत बोलताना, मुंबईतील रस्त्यांची अवस्था ही गरीब की जोरु आणि सबकी भाभी… असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
Published on: Aug 23, 2022 12:00 PM