बीड जिल्ह्यात मुंडे बहीण-भावात किंग कोण हे झालं स्पष्ट; परळी पाठोपाठ अंबाजोगाईतही सत्ता राष्ट्रवादीकडं

| Updated on: Apr 29, 2023 | 1:50 PM

बीड जिल्ह्यातील 10 पैकी परळी, केज, वडवणी, अंबाजोगाई, माजलगाव, गेवराई, पाटोदा-शिरुर, कडा, बीड या 9 बाजार समितींची प्रत्येकी 18 जागांसाठी निवडणूक झाली. त्यापैकी परळी बाजार समितीही महत्वाची ठरली.

बीड : सहकार क्षेत्रातील सर्वात महत्वाचा घटक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला पाहिलं जातं. त्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचा सरळ मार्ग हा या निवडणुकीतून जातो. त्यासाठी सर्वच पक्ष यासाठी आपली ताकद पणाला लावत असतात. यावरच मग जिल्हा परिषद, आमदारकी आणि खासदारकीचं गणितं ठरवली जातात. बीड जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत मुंडे गटातच चुरशी पाहयाला मिळाली. बीड जिल्ह्यातील 10 पैकी परळी, केज, वडवणी, अंबाजोगाई, माजलगाव, गेवराई, पाटोदा-शिरुर, कडा, बीड या 9 बाजार समितींची प्रत्येकी 18 जागांसाठी निवडणूक झाली. त्यापैकी परळी बाजार समितीही महत्वाची ठरली. यानिवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यासमोर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे आव्हान होते. त्यावर धनंजय मुंडे यांनी परळीत आपली सत्ता आणली. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचा झेंडा अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीवरही फडवला आहे. 18 पैकी 15 जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. तर पंकजा मुंडे यांना 3 जागांवर समाधान मानाव लागलं आहे.

Published on: Apr 29, 2023 01:50 PM
परळीत धनंजय मुंडे की पंकजा मुंडे आघाडीवर? कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष
गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर एआय तंत्रज्ञानाचा वापर; आता श्वान वाचवणार लोकांचे जीव