आम्ही कामं करतो, खोटं बोलत नाही, अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल
आम्ही कामं करतो, इतरांसारखं खोटं बोलत नाही. भोरमधील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सुप्रिया सुळे यांची नक्कल.
Ajit Pawar : भोरमधील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांची नक्कल केली आहे. त्यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, मी शब्दाचा पक्का आहे. मी शब्द दिला तर कोणाचही ऐकत नाही. पिंपरी चिंचवडमध्ये एकदम खास सुविधा दिल्या आहेत. म्हणजे आम्ही काम करतो. आम्ही ढगात गोळ्या मारत नाही. आम्ही वेळ मारून नेत नाही. इतरांसारखं खोटं बोलत नाही. तुम्ही मला निवडून द्या. मी तुम्हाला 2019 पर्यंत एमआयडीसी देईन अशी नक्कल करत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे
Published on: Apr 27, 2024 03:27 PM