H3N2 व्हायरसनं चिंता वाढवली; दोन रुग्णांचा मृत्यू
H3N2 विषाणूच्या संसर्गामुळे हरियाणा आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे
मुंबई : कोरोनाच्या संकटानंतर आता कुठं देशात सगळी सुरळीत सुरू झालं होतं. त्याचदरम्यान आता पुन्हा एकदा धोक्याची धंटा वाजली आहे. H3N2 व्हायरसनं चिंता वाढवली असून केंद्र सरकारने आज यावर बैठक बोलावली आहे. देशात H3N2 व्हायरसनं दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने H3N2 विषाणू तांडव करणार की काय असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे. H3N2 विषाणूच्या संसर्गामुळे हरियाणा आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने एक निवेदन जारी करून नागरिकांना आश्वासन दिलं आहे की, प्रशासनाकडून परिस्थितीवर तात्काळ बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव पाहता सरकार अलर्ट मोडमध्ये आलं आहे.