सरकारला काल कानपिचक्या; आता अजित पवारांचा दौराच रद्द, नेमकं कारण काय?
अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली होती. कोरोना परिस्थिती काय आहे, याची नेमकी परिस्थिती सांगा, असं आम्ही सरकारला सांगितल होतं
पुणे : राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यावर शिंदे-फडणवीस सरकारची कोणतीही भूमिका स्पष्ट नाही. यावरून विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल सरकारला कानपिचक्या देत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी दोन दिवसांचा पुणे दौरा रद्द केल्याने महाराष्ट्राच्या राजकाणात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी काही कारणास्तवर आजचे आणि उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्दद केल्याची माहिती समोर आली आहे. पण त्यांनी नेमकं कारण समजू शकलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली होती. कोरोना परिस्थिती काय आहे, याची नेमकी परिस्थिती सांगा, असं आम्ही सरकारला सांगितल होतं. ते अयोध्येला जाणार असतील तर जाऊ द्या, पण जे राज्यात उपलब्ध आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी कोरोनाची स्थिती सांगावी, अशा शब्दांत अजित पवारांनी खडसावलं होतं.