Mahamandal Vatap News : महामंडळ वाटपाचं सूत्र ठरलं! शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गटाला किती जागा?
त्यामुळे राज्ययातील सर्वच पक्षांनी त्यांच्या त्यांच्या मोर्चे बांधणीस सुरूवात केली आहे. तर आगामी निवडणूकांसाठी रणनिती आखली जात आहे. याचदरम्यान राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता महामंडळ समित्यांवर नियुक्त्यांची वाट कार्यकर्ते आणि नेत्यांकडून पाहिली जात होती.
मुंबई, 13 ऑगस्ट 2023 | काही महिन्यांवरच आता लोकसभेच्या निवडणूका राज्यात लागण्याची शक्यता आहे. तर त्यापाठोपाठ महापालिकांची रणधूमाळी देखील होईल. त्यामुळे राज्ययातील सर्वच पक्षांनी त्यांच्या त्यांच्या मोर्चे बांधणीस सुरूवात केली आहे. तर आगामी निवडणूकांसाठी रणनिती आखली जात आहे. याचदरम्यान राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता महामंडळ समित्यांवर नियुक्त्यांची वाट कार्यकर्ते आणि नेत्यांकडून पाहिली जात होती. ती प्रतिक्षा आता संपली आहे. राज्यातील विविध महामंडळांच्या बाबात फॉर्म्युला ठरल्याची माहिती सुत्रांकडून येत असून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गटाला किती महामंडळाच्या जागा मिळणार अशी चर्चा होताना दिसत आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गट आल्याने आता यात वाटे पडले आहेत. तर आता सरकारमध्ये तीन पक्ष आल्याने भाजपला ५० शिवसेनेला २५ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला २५ अशी महामंडळे वाटणीस येतील असे बोलले जात आहे.