टीकेनंतर भाजप आमदार रमेश पाटील यांचं स्पष्टीकरण, म्हणाले…
आमच्या सोबत आलेला माणूस स्वच्छ आणि निर्मळ होईल असं म्हटलं आहे. आमच्या पक्षात चांगले लोक येतात, आम्ही त्यांना स्वीकारतो
मुंबई : ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात, ते भाजपमध्ये गेल्यानंतर स्वच्छ होतात का?, असा प्रश्न विरोधकांकडून सातत्यानं उपस्थित केला जात आहे. यादरम्यान भाजपचे आमदार रमेश पाटील यांनी विधान परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी आमच्याकडे गुजरातहून निरमा पावडर येतं. ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही स्वच्छ करून घेतो, असं वक्तव्य होतं. त्यावर खूपच गदारोळ झाल्यानंतर आता पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
पाटील यांनी, आमच्या सोबत आलेला माणूस स्वच्छ आणि निर्मळ होईल असं म्हटलं आहे. आमच्या पक्षात चांगले लोक येतात, आम्ही त्यांना स्वीकारतो असेही त्यांनी म्हटलं आहे. हा विषय भूषण देसाई यांच्याबाबत होता. त्यांत्याच पक्षाने त्यांच्यावर भ्रष्टाचार आरोप केला. त्यामुळे ते इकडे आले. जर चांगली व्यक्ती असेल तर आम्ही घेतो. आमचा पक्ष चांगला आहे आणि त्यांना चांगली ट्रीटमेंट मिळते. त्यामुळे चांगली ट्रीटमेंट मिळत असेल तर कोणी का येऊ नये?