शेवटी त्यांनी ‘हे’ कबूल केलच; मनिषा कायंदे यांची प्रतिक्रिया
अलिकलडेच ठाकरे गटातील भूषण देसाई आणि माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यावरून टीका होत असतानाच भाजपचे आमदार रमेश पाटील यांनी विधान परिषदेत वक्तव्य केलं ज्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापले आहे.
मुंबई : ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात, ते भाजपमध्ये गेल्यानंतर स्वच्छ होतात? असा आरोप सतत विरोधकांकडून केला जातो. त्यानंतर अलिकलडेच ठाकरे गटातील नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई आणि माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यावरून टीका होत असतानाच भाजपचे आमदार रमेश पाटील यांनी विधान परिषदेत वक्तव्य केलं ज्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. ते म्हणाले, आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे. ती गुजरातमधून येते. त्यामुळे आम्ही साफसफाई करून घेतो. जो माणूस आमच्याकडे येईल, तो स्वच्छ होणार आहे”, यावर आता उद्धव ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी निशाना साधला आहे. भाजप आमदार रमेश पाटील यांनी जे विधान केले आहे ते अत्यंत धक्कादायक विधान आहे. खरं सांगायचं त्यांनी एका प्रकारे शिक्कामोर्तब केले आहे की भाजप एकेक करून सर्व पक्षाचे नेते आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न करतय. त्यावरून हे सिद्ध होत आहे की त्यांची काम करण्याची पद्धत नेमकी कशी आहे? कुठेतरी हा कायद्याचा, पदाचा आणि सत्तेचा हा दुरुपयोगच म्हणावा लागेल.