VIDEO | ‘तुमच्या वरिष्ठांनी बेईमानी केली, आम्ही त्यांना आरसा दाखवला’; राऊत फडणवीस यांच्यावर भडकले
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. तसेच शिवसेना फोडत सगळा पक्षच सोबत आणला असे म्हटलं होतं.
मुंबई : 19 ऑगस्ट 2023 | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेनं युती तोडल्यावरून पुन्हा एकदा पलटावार केला. त्यांनी शिवसेनेनं बेईमानी केल्यानेच आता सगळा पक्ष आणि राष्ट्रवादी सोबत घेतल्याची घणाघाती टीका केली. त्यावर आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केलाय. २०१४ आणि २०१९ ला भाजपकडून बेईमानी करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी म्हटलं आहे. राऊत यांनी, देवेंद्रजी असं म्हणाले की, आमच्याशी बेईमानी केली. म्हणून आम्ही शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. आणि त्यांना आमच्याबरोबर घेऊन आलो. आम्ही त्यांना आरसा दाखवला. बेमाई आम्ही केलेली नाही. बेईमानी तुमच्या वरिष्ठांनी केलेली आहे. शिवसेनेच्या बाबतीत. म्हणून शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. डूप्लिकेट माल घेऊ बसलेला आहात ही बेईमानी आहे असा टोला लगावला आहे.