संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; अजामीनपात्र वॉरंट जारी

| Updated on: Jan 06, 2023 | 4:40 PM

संजय राऊत यांच्या विरोधात मेधा किरीट सोमय्या यांनी मानहानीचा दावा ठोकला होता. त्याबाबतीत त्यांनी शिवडी दंडाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली होती.

मुंबई : उद्धव ठाकरे गटाला एका मागून एक असे धक्क बसताना दिसत आहे. याच्या आधी अनिल परब यांना ईडीने धक्का दिला. तर आता राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे. संजय राऊत यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दावाच्या संदर्भात न्यायालयाने हा वॉरंट जारी केला आहे.

संजय राऊत यांच्या विरोधात मेधा किरीट सोमय्या यांनी मानहानीचा दावा ठोकला होता. त्याबाबतीत त्यांनी शिवडी दंडाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली होती.

याप्रकरणी वारंवार तारखा देऊनही राऊत कोर्टात उपस्थित राहीले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात नॉन बेलेबल म्हणजेच अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात यावा अशी मागणी सोमय्यांच्यावतीने करण्यात आली होती. त्यानुसार शिवडी दंडाधिकारी कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केला. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 जानेवारी रोजी होणार आहे

Published on: Jan 06, 2023 04:40 PM
बावनकुळे- आव्हाड पुन्हा एकदा आमने-सामने, दर्ग्यारून बावनकुळेंची आव्हाडांवर टीका
नारायण राणे नामर्द माणूस आहेस. ईडी आणि सीबीआयच्या भीतीनं पळाला आहे… : संजय राऊत