शिवसेना खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा,इतका कारावास आणि दंड
शिवसेनेचे यूबीटी नेते संजय राऊत यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. डॉ. मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मुंबईतील महानगर न्यायालयाने आज हा आदेश दिला आहे.
उद्धव ठाकरे गटाचे नेते राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांना मानहानीच्या खटल्यात मुंबई माझगाव येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवित 15 दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच 25 हजार रुपयांचा दंड भरण्याचाही आदेश दिला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी डॉ. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात मुंबईतील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने गुरुवारी हा आदेश दिला आहे. संजय राऊत यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 500 अंतर्गत मानहानीच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले आहे. मुंबईतील रुईया कॉलेजमधील ऑर्गेनिक केमिस्ट्रीच्या प्रा. मेधा यांनी राऊत यांच्यावर कलम 499 (कोणत्याही प्रकारचे आरोप करणे किंवा प्रकाशित करणे) आणि500 (कथित टॉयलेट घोटाळा) अंतर्गत अब्रुनुकसानीचा दावा दाखल करीत कारवाई करण्याची मागणी केली होती.