एपीएमसी प्रकरणी अब्दुल सत्तारांना न्यायालयाचा दणका

| Updated on: Sep 14, 2022 | 10:08 AM

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अब्दुल सत्तार यांना जोरदार झटका दिला आहे. बाजार समितीच्या जागेप्रकरणी हस्तक्षेप केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्या आली आहे.

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अब्दुल सत्तार यांना जोरदार झटका दिला आहे. बाजार समितीच्या जागेप्रकरणी हस्तक्षेप केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्या आली आहे. औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जिंसी परिसरातील जागेचा वाद सुरु होता. हा वाद न्यायालयात असतानाही अब्दुल सत्तार यांनीच निकाल दिला होता, त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीही बरखास्त
करण्यात आली होती. त्यामुळे याप्रकरणी समितीच्या सदस्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन दाद मागण्यात आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाकडून अब्दुल सत्तार यांना नोटीस बजावत हस्तक्षेप न करण्याचे आदेशही देण्यात आले होते.

Published on: Sep 14, 2022 10:08 AM
Video: निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदेंचं ‘मिशन मुंबई’, रखडलेली कामं लावणार मार्गी
मुंबईसह कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा; पुन्हा मुसळधार