Covaxin | कोव्हॅक्सिन लसी घेतलेल्यांना आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यावर निंर्बंध येणार?, जाणून घ्या
Cस घेतलेल्या नागरिकांना आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार की नाही, याबाबत शंका उपस्थित झाल्या आहेत.
नवी दिल्ली: कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांनी लसीकरण झालेल्या नागरिकांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासासंदर्भात आपापली धोरणे जाहीर केली आहेत. या नियमांमुळे कोव्हॅक्सिन (covaxin) लस घेतलेल्या भारतीय प्रवाशांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध येण्याची शक्यता आहे.
अनेक देशांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या आपतकालीन यादीत असलेल्या लसींचाच वापर ग्राह्य धरला आहे. यामध्ये सिरमची कोव्हिशिल्ड, मॉडर्ना, फायझर, अॅस्ट्राझेन्का (टू), जान्सेन, सिनोफार्म या लसींचा समावेश आहे. या यादीत कोव्हॅक्सिनचा समावेश नसल्याने आता ही लस घेतलेल्या नागरिकांना आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार की नाही, याबाबत शंका उपस्थित झाल्या आहेत.