मुंबई विमानतळावर 3.98 किलो हेरॉईन जप्त
मुंबईत 3.98 किलो ग्रॅम वजनाचे हेरॉईन (Heroin) जप्त करण्यात आले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अर्थात अंमली पदार्थ नियामक पथकाने ही कारवाई केली. दक्षिण आफ्रिकन नागरिकाला (South African citizen) या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबईत 3.98 किलो ग्रॅम वजनाचे हेरॉईन (Heroin) जप्त करण्यात आले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अर्थात अंमली पदार्थ नियामक पथकाने ही कारवाई केली. दक्षिण आफ्रिकन नागरिकाला (South African citizen) या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई करण्यात आली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई केली. बॅगेज ट्रॉलीमध्ये ड्रग्ज लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडे जवळपास 4 किलो वजनाचे हेरॉईन सापडले आहे. बाजारभावाप्रमाणे याची किंमत 20 कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती आहे.