‘अजित पवार वारंवार शरद पवारांना भेटतात हा एक साथीचा आजार’; काका-पुतण्या भेटीवर सामनातून निशाना

| Updated on: Aug 14, 2023 | 10:52 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाना साधण्यात आला आहे. अजित पवार- शरद पवार भेटीसह शिंदे यांच्या आजारपणावर गंमत-जमंत अशा आशया खाली सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे.

मुंबई, 14 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये एका उद्योगपतीच्या घरात भेट घेतली. याभेटीमुळे सध्या सोशल मिडीयासह राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. यावरून सामनातून टीका करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाना साधण्यात आला आहे. अजित पवार- शरद पवार भेटीसह शिंदे यांच्या आजारपणावर गंमत-जमंत अशा आशया खाली सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे. यावेळी अजित पवार वारंवार शरद पवारांना भेटतात हा एक साथीचा आजार आहे. तर मुख्यमंत्री शिंदे आजारी पडून वारंवार विश्रांतीसाठी साताऱ्यातील शेतावर हेलिकॉप्टरने उतरतात हा महाराष्ट्रास लागलेला मानसिक आजार आहे. मुख्यमंत्र्यांचा वाढता आजार हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तर दोन पवारांची ‘गंमतभेट’ महाराष्ट्र म्हणजे ‘गंमत जंमत’ नाही हे आम्ही येथे परखडपणे बजावत आहोत! असे देखील सामनातून म्हटलं आहे

Published on: Aug 14, 2023 10:50 AM
स्वातंत्र्यदिनापूर्वी एनआयएची मोठी कारवाई; कोल्हापुरात तीन ठिकाणी छापेमारी, तीन जणांना घेतलं ताब्यात
‘झोप उडाली की, ते ऊठसूट हेलिकॉप्टरने शेतावर आराम करतात’; सामानातून शिंदे यांच्यावर टीका