कोल्हापूरच्या पंचगंगा नदीपात्रात मगर
कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत मगर आढळून आली आहे. नदीत मगरीचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कोल्हापुरातील पंचगंगा नदीपात्रात अजस्त्र मगरीचं दर्शन झाले आहे. नदीपात्रात सुमारे आठ फूट लांबीची मगर आढळून आली आहे. नदीत मगरीचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे. ही मगर नदीत मुक्तपणे विहार करताना दिसून येत आहे.