बापरे बाप…. नदी सोडून मगर आली थेट पुलावरच; वाहतूकही खोळंबली
कोकणातील अनेक भागात मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसापासून धुमाकूळ घातला आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांची पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.
खेड, 20 जुलै 2023 | रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात पाऊस सध्या पडत आहे. तर कोकणातील अनेक भागात मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसापासून धुमाकूळ घातला आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांची पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे अनेक जलचर हे मानवी वस्तीकडे जात आहेत. सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गावर चक्क मगरीचे दर्शन अनेक प्रवाशांना झाली आहे. तर मगर महामार्गावर आल्याने काही अंशी वाहतूक खोळंबली आहे. ही मगर खेड जवळच्या जगबुडी नदीवरील पुलावर आली होती. जिचे पहाटे चार वाजता मगरीचे दर्शन झाले. तर मगर थेट पुलावर आल्याने अनेक प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
Published on: Jul 20, 2023 12:05 PM