आदिवासी अधिकाऱ्याच्या घरातील पैसे मोजण्यासाठी मशिन मागवली…
आदिवासी अधिकारी असलेले कुमार बागुल यांचा फोनही ताब्यात घेण्यात आला असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. कुमार बागुलांची चौकशी केल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा केला जाईल असंही या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
नाशिकमध्ये आज एका आदिवासी विभागाच्या घरामध्ये कोट्यवधी रुपये सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे त्यांच्या घरातील झाडाझडती घेण्यास सुरुवात केली असून ताब्यात घेण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव कुमार बागुल असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही घरामध्ये कोट्यवधी रुपये सापडले असल्याने पोलिसांनी आता पैसे मोजण्याची मशीन मागवण्यात आली आहे. या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे. आदिवासी अधिकाऱ्याच्या घरात कोट्यवधी रुपये सापडले असल्याने त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांच्या मालमत्ता, त्यांची बॅंक खात्यांचीहही माहिती घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. आदिवासी अधिकारी असलेले कुमार बागुल यांचा फोनही ताब्यात घेण्यात आला असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. कुमार बागुलांची चौकशी केल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा केला जाईल असंही या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.