शिर्डी साईबाबाचरणी कोट्यवधींचे दान; सलग सुट्यांमुळे भाविकांची गर्दी
सलग सुट्या असल्यामुळे शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. भाविकांनी कोट्यावधींचे दान साईचरणी अपर्ण केले आहे.
सलग सुट्या असल्यामुळे शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. भाविकांनी कोट्यावधींचे दान साईचरणी अपर्ण केले आहे. गेल्या पाच दिवसांत तब्बल 3 कोटी 55 लाख रुपयांचं दान भाविकांनी साईबाबाचरणी अपर्ण केले आहे. यामध्ये दान पेटीमधील तीन कोटी 22 लाखांच्या दानासह 33 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तर दीड लाखांच्या चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. या दानामध्ये देणगी काऊंटर आणि ऑनलाईन दानाचा समावेश करण्यात आलेला नाही.