Navneet Rana vs Shivsena : मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची गर्दी, महिला शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया
मुंबईत राणा विरुद्ध ठाकरे (Rana vs Thackeray) असा संघर्ष शुक्रवार पाहायला मिळाला. मातोश्रीबाहेर (Matoshree) जाण्यासाठी राणा दाम्पत्यानं गनिमी कावा केला तर काय, यासाठी आधीच शिवसैनिक रात्रीपासूनच सज्ज झाले. रात्रीपासून खारबाहेर शिवसैनिकांनी ठिय्या दिलाय. सकाळी घोषणाबाजीही करण्यात आली. पोलीस बंदोबस्तही (Police Security) केला गेला.
मुंबईत राणा विरुद्ध ठाकरे (Rana vs Thackeray) असा संघर्ष शुक्रवार पाहायला मिळाला. मातोश्रीबाहेर (Matoshree) जाण्यासाठी राणा दाम्पत्यानं गनिमी कावा केला तर काय, यासाठी आधीच शिवसैनिक रात्रीपासूनच सज्ज झाले. रात्रीपासून खारबाहेर शिवसैनिकांनी ठिय्या दिलाय. सकाळी घोषणाबाजीही करण्यात आली. पोलीस बंदोबस्तही (Police Security) केला गेला. दरम्यान, खार येथील प्रत्येक गाडी शिवसैनिकांकडून तपासली जाते आहे. शिवसैनिकांना राणा दाम्पत्य हे गाडीच्या डिकीमधून लपून बाहेर जाण्याचा संशय होता. त्यामुळे खार येथील राणांच्या घराबाहेरुन जाणाऱ्या प्रत्येक गाडीची डिकी महिला शिवसैनिकांनी तपासल्या आहेत. पोलिसांनी बॅरिकॅटिंगकरुन आधी तगडा पोलीस बंदोबस्त खारमध्ये ठेवलाय. दरम्यान, त्याआधी रात्रभर शिवसैनिकांनी पहारा दिलाय. त्यानंतर शनिवारी सकाळपासून वातावरण तापायला सुरुवात झाली.
दुसरीकडे कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांसमोरची आव्हानंही वाढली आहेत. सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान पठन करण्याचा इशारा राणा दाम्पत्यानं दिला होता. त्यासाठी राणा दाम्पत्य हे शुक्रवारी अमरावतीवरुन मुंबईत दाखल झाले होते.