लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो,आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी
गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे लोणावळा परिसरातील डोंगररांगा हिरवाईने नटल्याचे पाहायला मिळत आहेत. भुशी धरणही अखेर ओसंडून वाहू लागले आहेत. यामुळे आज विकेंडच्या दिवशी पर्यटकांनी भूशी धरणावर गर्दी करायला सुरुवात केली आहे.
लोणावळा, 23 जुलै 2023 | दरवर्षी पावसाळा सुरू झाला की पर्यटक लोणावळ्यामध्ये फिरायला येतात. कॅम्पिंग, ट्रेकिंग आणि खळखळून वाहणारे धबधबे यांचा आनंद घ्यायला लोणावळ्यात येतात. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे लोणावळा परिसरातील डोंगररांगा हिरवाईने नटल्याचे पाहायला मिळत आहेत. पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेले भुशी धरणही अखेर ओसंडून वाहू लागले आहेत. यामुळे आज विकेंडच्या दिवशी पर्यटकांनी भूशी धरणावर गर्दी करायला सुरुवात केली आहे.
Published on: Jul 23, 2023 10:18 AM