Kolhapur tourists : कोल्हापुरात राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी दिला चोप

| Updated on: Jul 17, 2022 | 11:34 PM

पावसाळी पर्यटन सुरू झालंय. धबधब्यावर पर्यटक गर्दी करू लागलेत. कोल्हापुरातील राऊतवाडी धबधब्यावर (Rautwadi waterfall) पर्यटकांनी गर्दी केली होती. या गर्दी काहींनी हुल्लडबाजी सुरू केली.

कोल्हापूर : पावसाळी पर्यटन सुरू झालंय. धबधब्यावर पर्यटक गर्दी करू लागलेत. कोल्हापुरातील राऊतवाडी धबधब्यावर (Rautwadi waterfall) पर्यटकांनी गर्दी केली होती. या गर्दी काहींनी हुल्लडबाजी सुरू केली. अशा हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. पर्यटक एकत्र आल्यानं याठिकाणी पर्यटकांनी गर्दी (Crowd of tourists) झाली होती. या गर्दीचा गैरफायदा काहींनी घेतला. काही जण याठिकाणी हुल्लडबाजी करत होते. ही बाब पोलिसांच्या (Police) लक्षात आली. त्यांनी अशा या हुल्लडबाजांवर लक्ष ठेवलं. त्यानंतर त्यांना चांगलाच चोप दिला. धबधबा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. या पर्यटकांत हुल्लडबाजी करणारेही काही जण असतात. रस्त्यावर नाचणे, धबधब्याजवळ हॉर्न वाजवत गाड्या फिरविणे, गाडीतील टेपरेकॉर्डर लाऊन धिंगाणा घालणे अशा प्रकारची हुल्लडबाजी केली जाते. तरुण मुलींना छेडण्याचे प्रकारही घडतात. अशीच घटना घडली. साध्या वेषातील पोलीस तैनात होते. त्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी हुल्लडबाडी करणाऱ्यांची चांगलीच धुलाई केली.

Published on: Jul 17, 2022 11:32 PM
Santosh Bangar : संतोष बांगर यांची आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल, सोशल मीडियावर होतायत ट्रोल; अडचणी वाढणार
मुंडे बहिणभावांचा वाद श्रेयवादावरुन तापला