मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी; ऑडिओ क्लिप व्हायरल
ऑडिओ क्लिपमुळे एकनाथ शिंदे आणि संदीपान भुमरे यांच्यावरही जोरदार टीका केली जात आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटाकडून अजून कोणतेही स्पष्टीकरणे देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठणमध्ये सभा होत आहे, मात्र त्याआधीच पैसे देऊन गर्दी जमवल्याचे संभाषण असलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठणमध्ये सभा होत असल्याने त्या सभेसाठी गर्दी पाहिजे म्हणून लोकांना पैसे देऊन आणले जात असल्याचा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला होता. त्यानंतर आजच प्रत्येकाल अडीचशे ते तीनशे रुपये देणार असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकनाथ शिंदे पुन्हा एकदा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. या ऑडिओ क्लिपमुळे एकनाथ शिंदे आणि संदीपान भुमरे यांच्यावरही जोरदार टीका केली जात आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटाकडून अजून कोणतेही स्पष्टीकरणे देण्यात आले आहे.