Amravati मधील राड्यानंतर अचलपूर, परतवाडा शहरात संचारबंदी

| Updated on: Apr 18, 2022 | 12:36 PM

अमरावतीच्या अचलपूरमध्ये (Achalpur, Amravati) झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी तातडीनं पावलं उचलली आहे. अचलपुरात झेंडा लावण्यावरुन दोन गटात हाणामारी झाली होती. दरम्यान, या हाणामारीप्रकरणी सकाळी 9 वाजेपर्यंत 16 जणांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. तर 35 जणांवर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.

अमरावतीच्या अचलपूरमध्ये (Achalpur, Amravati) झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी तातडीनं पावलं उचलली आहे. अचलपुरात झेंडा लावण्यावरुन दोन गटात हाणामारी झाली होती. दरम्यान, या हाणामारीप्रकरणी सकाळी 9 वाजेपर्यंत 16 जणांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. तर 35 जणांवर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. अचलपूर आणि परतवाडा शहरात या राड्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच अचलपुरातील पोलिस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. सध्या अचलपूरमध्ये परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्ण शांतता या भागात पाहायला मिळली. अचलपूर आणि परतवाडा (Paratwada) शहरात कलम 144 अंतर्गत संचारबंदीही लागू करण्यात आली आहे.

Published on: Apr 18, 2022 12:36 PM