Biporjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या समुद्रात अधिक तीव्र; ‘या’ किनारपट्टी भागाला तडाखा
भारतीय हवामान विभागाने रविवारी दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, बिपरजॉय चक्रीवादळ पूर्वमध्य अरबी समुद्रावर 11 जून 2023 रोजी मध्यरात्री 2.30 वाजता पोरबंदरच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे 510 किलोमीटर अंतरावर होते. पुढील सहा तासांमध्ये हे चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
द्वारका : बिपरजॉय चक्रीवादळ येत्या काही तासांत अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रासह गुजरातच्या किनारपट्टी भागातही याचा परिणाम दिसून येणार आहे. भारतीय हवामान विभागाने रविवारी दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, बिपरजॉय चक्रीवादळ पूर्वमध्य अरबी समुद्रावर 11 जून 2023 रोजी मध्यरात्री 2.30 वाजता पोरबंदरच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे 510 किलोमीटर अंतरावर होते. पुढील सहा तासांमध्ये हे चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर आज सकाळपासूनच उंच लाटा उसळू लागल्या होत्या. मात्र आता महाराष्ट्रातील किनारपट्टी भागातील याची तीव्रती ही कमी झाली असून याचा फटका गुजरातला बसताना दिसत आहे. येथील द्वारका आणि वलसाड मधील समुद्राला उधान आलं असून समुद्र खवळला आहे. येथे जारदार वारा सुटला आहे. तर समुद्र किनाऱ्यावर मोठ मोठ्या लाटा उसळत आहेत. तर याच्याआधीच हवमान विभागाने गुजरातमधील सौराष्ट्रला येलो अलर्ट दिला आहे.