‘कदाचित अजित दादांना दाडी नसल्याने तो फिल…’; शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेवरून शिवसेना नेत्याचा पलटवार

| Updated on: Jun 22, 2023 | 8:45 AM

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी जर मी सरकारवर, शिंदेवर टीका केली की मी बोलतो असं म्हणता. त्यामुळे तुम्ही नुसतीच दाडी कुरवाळत बसू नका? काम करा. मग मी तुमचं कौतुक करेन असे अजित पवार म्हणाले होते.

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी जर मी सरकारवर, शिंदेवर टीका केली की मी बोलतो असं म्हणता. त्यामुळे तुम्ही नुसतीच दाडी कुरवाळत बसू नका? काम करा. मग मी तुमचं कौतुक करेन असे अजित पवार म्हणाले होते. त्या टीकेला आता शिंदे गटाचे नेते नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भुसे यांनी, शिंदे हे असे पहिले मुख्यमंत्री आहेत जे वीस वीस तास काम करतात. तर ज्याला दाढी असेल, तो जर दाढी कुरवाळत असेल, तर त्यात कुणाला वाईट वाटण्याचे कारण नाही असा टोला अजित पवार यांना लगावला आहे. तर कदाचित अजित दादांना दाढी नसल्याने तो फिल त्यांना येत नसेल. असो पण आम्ही अजित दादांना कुरवाळू अशी मिश्किल टिपणी त्यांनी करताना, धर्मवीर आनंद दिघे यांच्यापासून ठाण्यात दाढीची परंपरा राहिल्याचंही ते म्हणाले.

Published on: Jun 22, 2023 08:45 AM
“भ्रष्टाचाराविरोधात मोर्चाचे ठाकरे गटाचे लॉजिक काय?”, शिवसेनेच्या नेत्याची टीका
“अजित पवार यांचं ‘ते’ वक्तव्य दुर्लक्षित करण्यासारखं नाही”, ठाकरे गटाच्या नेत्याची प्रतिक्रिया