उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये उर्दूमध्ये बॅनर; दादा भुसे यांचं थेट भाष्य, म्हणाले…

| Updated on: Mar 26, 2023 | 11:20 AM

Dada Bhuse on Uddhav Thackeray Malegoan Sabha :उद्धव ठाकरे यांची आज नाशिकमध्ये सभा होत आहे. मंत्री दादा भुसे यांनी या सभेवर भाष्य केलंय. त्यांनी नेमकं काय म्हटलंय? पाहा..

मुंबई : उद्धव ठाकरे यांची आज नाशिकमध्ये सभा होतेय. या सभेवर मंत्री दादा भुसे यांनी टीका केली आहे. ठाकरे यांच्या स्वागतासाठी मुस्लिम भागात उर्दू भाषेत बॅनर लावण्यात आले आहेत. त्यावरही दादा भुसे यांनी भाष्य केलंय. नाशिक आणि मालेगावमधील जनतेच्या आधीपासूनच आम्ही संपर्कात आहोत. मुस्लिम बांधवांच्याही आम्ही संपर्कात आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आम्ही चालतो. हे मालेगावमधील सर्व धर्मियांच्या लोकांना माहिती आहे. निवडणुकीत कुणाला निवडून द्यायचं. याचा अधिकार हा मालेगावच्या जनतेचा आहे. त्यामुळे जनताच सगळ्या गोष्टींचं उत्तरं देणार, असं दादा भुसे म्हणालेत.

Published on: Mar 26, 2023 11:20 AM
मालेगावात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; कोणा कोणाचा घेणार समाचार?
भाजपचे टार्गेट बारामती, कर्जत; बावनकुळे यांचा बारामती दौऱ्यावर