कोल्हे यांच्या विरोधात दादा देतील तो उमेदवार खासदार होणार, रुपाली पाटील यांची ग्वाही

| Updated on: Dec 29, 2023 | 9:22 PM

अजित पवार यांच्या विरोधात महायुतीच्या भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांनी दंड थोपटले आहेत. निधी वाटपात अन्याय केल्याची त्यांची भावना आहे. मात्र, अजित पवार विरोधकांना बजेट देतात. तर लोकप्रतिनिधींनी पुण्याचे पालक मंत्री अजित पवार यांच्याकडे जाऊन बाजू मांडायला हवी होती. परंतू थेट कोर्टात जाणे बरोबर नसल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी म्हटले आहे.

पुणे | 27 डिसेंबर 2023 : पुण जिल्हा नियोजन समितीमधील भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांनी आपल्याला निधी न मिळाल्याने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अजित पवार यांनी निधी वाटपात अन्याय केलेला नाही. जर निधी कमी मिळाल्याची भावना असेल तर पालक मंत्री अजित पवार यांच्याकडे जाऊन त्यांनी तक्रार करायला हवी होती. विरोधकांनी कांद्याची निर्यात बंदी उठवावी यासाठी शेतकरी आक्रोश मोर्चा काढला आहे. अजित दादाचे केंद्रात वजन असल्याने ते शेतकऱ्यांचा हा प्रश्न निश्चित सोडवतील असे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील यांनी म्हटले आहे. अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांनी मतदार संघात काम केल्याने अमोल कोल्हे निवडून आले होते. आता अजित पवार कोल्हे यांच्या विरोधात जो उमेदवार देतील तोच निवडून येईल असे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी म्हटले आहे.

Published on: Dec 27, 2023 05:47 PM
पराभवाचा वचपा काढणारच, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिले जलील यांना आव्हान
शिवसेनेवाले बाबरी खटल्यात आरोपी तर भाजपवाले रणछोडदास, संजय राऊत यांचा हल्लाबोल