Saamna | ‘बाळासाहेबांचं स्वप्न ही भाजपच्या तोंडची भाषा कारस्थान’-सामना-tv9
सामनातील अग्रलेखातून फडणवीस यांच्या त्या विधानाचा समाचार घेताना, बाळासाहेबांचे स्वप्न वगैरे ही भाजपच्या तोंडची भाषा हे कारस्थान असल्याचे म्हटलं आहे.
राज्यात दहीहंडीचा सण हा राजकारण्यांसाठी राजकीय टोलेबाजीचा फड झाला होता. प्रत्येक दहीहंडीच्या स्टेजवरून राजकीय टीका होताना दिसत होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न हे भाजपच पूर्ण करेल, असं विधान केलं होतं. त्यावरून आता शिवसेनेचं मुखपत्र सामनातून टीका करण्यात आली आहे. आजच्या सामनातील अग्रलेखातून फडणवीस यांच्या त्या विधानाचा समाचार घेताना, बाळासाहेबांचे स्वप्न वगैरे ही भाजपच्या तोंडची भाषा हे कारस्थान असल्याचे म्हटलं आहे. त्याचबरोबर ज्यांनी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांना विसरले ते बाळासाहेबांचे स्वप्न कसले साकार करणार? असाही टोला सामनातून हाणला आहे.