Pune | दहीहंडी उत्सवात अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त – tv9

| Updated on: Aug 19, 2022 | 5:27 PM

पुण्यात देखील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून नाकाबंदी करण्यात आलेले आहे. तसेच दहीहंडीच्या निमित्ताने देखिल प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्यात आल्याचं गुप्ता यांनी सांगितले.

राज्यात आज दहीहंडी जोरात केली जात आहे. त्याप्रमाणे पुण्यात देखील जल्लोषात दहीहंडी उत्सव पार पाडला जात आहे. पुण्यात बाराशेच्या वर दहीहंडी चे कार्यक्रम होत असून पोलिसांकडून योग्य काळजी घेतली जात असल्याचे पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले आहे. तसेच रायगड येथील हरिहरेश्वरमध्ये सापडलेल्या संशयास्पद बोटी आणि AK-47 बंदुकांच्या पार्श्वभूमिवर राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याप्रमाणे पुण्यात देखील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून नाकाबंदी करण्यात आलेले आहे. तसेच दहीहंडीच्या निमित्ताने देखिल प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्यात आल्याचं गुप्ता यांनी सांगितले.

 

Published on: Aug 19, 2022 05:27 PM
अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयात छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन
CM Eknath Shinde | हिंदु सण उत्साहात, जल्लोषात साजरे झाले पाहिजेत – tv9