समृद्धी महामार्गावर होणारे अपघात आणि जाणारे बळी यावरून सामनातून सरकारला सवाल, याला ‘समृद्धी’

| Updated on: Aug 03, 2023 | 10:51 AM

मागित काही दिवसापासून येथे अपघातांची मालिका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. आधी खासगी बसचा अपघात आणि आता ठाण्यात समृद्धी महामार्गावर पुलाचा गर्डर कोसळून झालेली दुर्घटना ज्यात १५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला.

मुंबई | 03 ऑगस्ट 2023 : समृद्धी महामार्गावर होणारे अपघात काही कमी होताना दिसत नाहीत. मागित काही दिवसापासून येथे अपघातांची मालिका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. आधी खासगी बसचा अपघात आणि आता ठाण्यात समृद्धी महामार्गावर पुलाचा गर्डर कोसळून झालेली दुर्घटना ज्यात १५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर होणाऱ्या अपघातावरून ठाकरे गटाचे मुखपत्र दैनिक सामनामधून समृद्धी महामार्ग, रक्त आणि अश्रू या शीर्षकाखाली सरकारवर हल्लाबोल करण्यात आलं आहे. यावेळी अपघातांच्या मालिंकामुळे या महामार्गाला ‘समृद्धी’ कसं म्हणणार? असा सवाल केला आहे. तर ‘समृद्धी’ महामार्ग हा सध्याच्या राज्यकर्त्यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असंही म्हटलं असून तुमचे हे ‘स्वप्न’ निरपराध्यांसाठी ‘काळस्वप्न’ ठरत आहे, त्याचे काय? असे म्हटलं आहे.

Published on: Aug 03, 2023 10:51 AM
“भाजपने सोडलेला वळू म्हणजे संभाजी भिडे”; काँग्रेस नेत्याचा आरोप
मुंबईत बेस्ट बस कंत्राटी कर्मचारी ठाम, मात्र मुंबईकरांचे हाल; दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच