सांगलीत सिविल हॉस्पिटलसाठी भीक मांगो आंदोलन? कोण करतय आंदोलन आणि नेमकं कारण काय?
सांगली सिविल हॉस्पिटल महत्वाची सेवा देणारा थोरला दवाखाना ठरला आहे. येथे सिमावर्ती भाग आणि जिल्ह्यातील काणोकोपऱ्यातून नागरीक येथे उपचारांसाठी येत असतात. मात्र सध्या सिविल हॉस्पिटल प्रशासनाकडून येथील सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे.
सांगली, 06 ऑगस्ट 2013 | महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांगली सिविल हॉस्पिटल महत्वाची सेवा देणारा थोरला दवाखाना ठरला आहे. येथे सिमावर्ती भाग आणि जिल्ह्यातील काणोकोपऱ्यातून नागरीक येथे उपचारांसाठी येत असतात. मात्र सध्या सिविल हॉस्पिटल प्रशासनाकडून येथील सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. येथे जुन्या इमारती गळत आहेत त्यांची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे अनेक रूग्णांचे हाल होत आहेत. तर शासनाकडून सांगली सिविल हॉस्पिटलला मुबलक असा निधी आला आहे. मात्र कोणतीच सुधारणा येथे पहायला मिळत नाही. त्यावरून दलित महासंघाच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटल परिसरात भीक मागो आंदोलन केलं गेलं. तर जी भीक गोळा होईल ती सिविल हॉस्पिटलला देण्यात येणार आहे. यावेळी भीक आंदोलन करण्यामागे नेमकं कारण काय? पाहा हा व्हिडीओ…
Published on: Aug 06, 2023 08:22 AM