झाडं कोसळून रिक्षाचं नुकसान, चालक थोडक्यात बचावला

| Updated on: May 11, 2022 | 10:13 AM

रिक्षावर झाडं कोसळल्याने रिक्षाचे नुकसान झाल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे. या घटनेत रिक्षा चालक थोडक्यात बचावला आहे. ही झाडं रस्त्यातून हटवण्याचे काम सुरू आहे.

रिक्षावर झाड कोसळल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे एक नव्हे दोन नव्हे तर तीन झाडं कोसळली ही झाडे रिक्षावर कोसळल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. या रिक्षात चालक आणि एक प्रवासी देखील होता. प्रसंगावधान दाखवत या दोघांनी रिक्षातून उडी मारल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेत रिक्षासोबतच अन्य वाहनाचे देखील नुकसान झाले आहे.

Published on: May 11, 2022 09:58 AM
औरंगाबादच्या लेबर कॉलनीवर हातोडा
नांदेड जिल्ह्यातील नायगावमध्ये वादळी वाऱ्याचं थैमान