सुरेखा पुणेकर यांचे नाव घेत गौतमी पाटील हिला कुणाचा इशारा? ‘तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला…’
मी खानदानी पाटील आहे. त्याचे सगळे पुरावे देऊ शकते. पण काही कलाकार नावासाठी काहीही प्रकार करत आहेत. कलेशी प्रामाणिकपणे राहुन नृत्य केलं की नाव होतंच. लावणीचे पावित्र्य जपले गेले पाहिजे अशा शब्दात गौतमी पाटील हिला एका कलाकार मैत्रिणीने टोला लगावलाय.
सोलापूर | 2 नोव्हेंबर 2023 : सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात सापडत आहे. यावरूनच गौतमी पाटील हिच्या एका सहकारी कलाकार मैत्रिणीने तिला इशारा दिला आहे. लावणीचे पावित्र्य जपायलाच हवे. या क्षेत्रात काही जणी नव्याने आल्या आहेत. मात्र, त्यांनी आपल्या कार्यक्रमात अश्लीलपणा करु नये. सध्या जे काही सुरु आहे असे प्रकार होता कामा नये असे नृत्यांगणा राधा पाटील हिने म्हटले आहे. सध्या लावणीच्या कार्यक्रमात भरपुर अश्लीलपणा सुरु आहे. यामुळे नविन येणाऱ्या कलाकारांवर समाजातून टीका होणारच असे राधा पाटील म्हणाली. सुरेखा पुणेकर सांगतात त्या प्रमाणे असेच जर होत राहिले तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही असा इशाराही तिने दिला. कलेशी प्रामाणिकपणे राहुन नृत्य केलं की नाव होतंच. लावणीचे पावित्र्य जपले गेले पाहिजे. गौतमी ही चांगली नाचते. शेवटी कसा डान्स करायचा ही ज्याची त्याची इच्छा असते. मला दुसऱ्याच्या आडनावाचे काय माहित नाही पण मी खानदानी पाटील आहे स टोलाही तिने लगावला.