ते रात्रीचं पडलेले स्वप्न सांगतात; राऊतांवर शिंदे गटाच्या नेत्याची टीका

| Updated on: Mar 24, 2023 | 3:26 PM

दंगली वक्तव्यावरून मंत्री दीपक केसरकर यांनी देखील राऊत यांच्यावर टीका केली होती. तसेच संजय राऊत कोण आहेत असं म्हटलं आहे.

मुंबई : सध्या दंगली घडवण्यासाठी पडद्यामागून पटकथा लिहिली जातेय. असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारसह राज ठाकरे यांच्यावर केला आहे. त्यानंतर त्यांच्यावर खरमरीत टीका करत शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे. शिरसाट यांनी, राऊत हे रात्री पडलेले ते स्वप्न पत्रकारांच्या माध्यमातून सकाळी सांगण्याचं प्रयत्न करतात. बाकी काही नाही.

यावरूनच मंत्री दीपक केसरकर यांनी देखील राऊत यांच्यावर टीका केली होती. तसेच संजय राऊत कोण आहेत असं म्हटलं आहे.

राऊत यांन, या महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवायचं, दंगली घडवायच्या आणि मग निवडणुकांना सामोरे जायचं असं एक पडद्यामागची पटकथा लिहिली जात आहे. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला लोकांचा पाठिंबा मिळतोय याच्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांची बगलबच्चे हादरलेले आहेत.

त्यामुळेच आमच्याशी सामना करण्यासाठी जाती आणि धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचे कारस्थान दिसत आहे. ही पडद्यामागची फटकथा लोकांपर्यंत पोहोचलेली आहे असेही राऊत म्हणाले.

Published on: Mar 24, 2023 03:26 PM
दंगली वक्तव्यावर केसरकरांचा वार; म्हणाले, राऊत यांच्यावर कारवाई केली पाहिजे
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर नाना पटोले म्हणताय…