बाहेरचे लोक आणून सभा घ्यावी लागते यातच ‘त्यांचे’ अपयश; योगेश कदम यांचा पलटवार

| Updated on: Mar 11, 2023 | 7:53 AM

दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी ठाकरे गटावर निशाना साधत मी ही सभा यशस्वी झाली मी असं म्हणणार नाही असं म्हटलं आहे.

मुंबई : रामदास कदमांच्या होमग्राऊंडवर जात उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. रत्नागिरीतील खेडमध्ये झालेल्या सभेत त्यांनी अनेकांचा समाचार घेतला. त्यावेळी तेथे लोकांचा जनसागर लोटल्याचे पहायला मिळत होते. यावरून दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी ठाकरे गटावर निशाना साधत मी ही सभा यशस्वी झाली मी असं म्हणणार नाही असं म्हटलं आहे. तर इतर पाच जिल्ह्यातील लोक आणून सभा घेतली. सभेत कौटुंबिक वादाचं राजकीय भांडवल केल्याचाही आरोप कदम यांनी ठाकरे गटावर केला. बाहेरचे लोक आणून येथे सभा घेणे याचत त्यांचे अपयश आहे. तर अशा 100 घेतल्या तरी काही फरक पडणार नसल्याचेही ते म्हणाले.

Published on: Mar 11, 2023 07:53 AM